आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक चेक कसे करावे?

by HTM
27 views
आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक चेक कसे करावे?

आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला आहे हे कसे चेक करायचे हे तुम्हाला या पोस्टद्वारे कळणार आहे. नवीन सिम कार्ड घेण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याची गरज लक्षात घेऊन, भारतातील जवळपास सर्वच लोकांनी आधार कार्ड बनवून घेतले आहे. आता भारतातील सुमारे 90 टक्के लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे.

ज्यावेळी आपण आधार कार्ड बनवतो त्यावेळेस आपण आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करतो पण काही कालांतराने कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे हेच विसरून जातो. जर तुम्हाला पण तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जाणून घेयाचे असेल तर ही पोस्ट तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे.

आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक चेक कसे करावे?

आधार कार्डची आपल्याला प्रत्येक सरकारी कामात गरज लागते. आपल्याला माहीतच असेल की आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, कारण जेंव्हा आपण कोणता ऑनलाईन फॉर्म भरताना आधार कार्ड Submit करतो त्यावेळी आपल्या मोबाईल नंबर वर OTP येत असतो.

याचे कारण असे की आपण आपला नंबर आधार कार्डला लिंक केलेला आहे. परंतु कालांतराने काही जण विसरून जातात की त्यांनी आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक केला होता. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर माहीत नसेल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वात आधी UIDAI च्या आधिकारीक वेबसाईटवर जावे किंवा खलील लिंक वर क्लिक करावे.

Click Here

2) आता आपल्यासमोर UIDAI चे होमपेज ओपन होईल. तेथे “My Aadhaar” पर्यायातून “Verify an Aadhaar Number” हा पर्याय निवडावा.

3) येथे दिलेल्या रकान्यात आधार नंबर आणि Captcha फील करावा आणि “Procced to Verify Aadhaar” बटन वरती क्लिक करावे.

4) आता तुमच्यासमोर खाली दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईल त्यात मोबाईल नंबर चे शेवटचे 3 अंक दिलेली आहेत.

आता तुम्हाला लगेच कळेल की कोणता नंबर तुम्ही आधार कार्डला लिंक केलेला आहे, कारण शेवटचे तीन अंक तुम्हाला माहित आहेत. अश्या प्रकारे तुम्ही आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सहजपणे माहिती करून घेऊ शकता.

मला आशा आहे की आपल्याला ही पोस्ट चांगल्या प्रकारे समजली असेल. तरीही काहीही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आजची पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

You may also like

Leave a Comment